नागपूरच्या आमदार निवासात क्वॉरंटाइन ९ जणांना कोरोना

नागपूर: नागपूर महानगरपालिकेकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार शनिवारी नागपुरात चार नवीन कोरोना रूग्णांची पुष्टी झाली आहे. नागपुरात संसर्ग झालेल्यांची संख्या ६३ वर पोहोचली होती, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे, तर १२ जणांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. राज्यातील कोरोना आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसा नागपूरच्या आमदार निवासात क्वॉरंटाइन केलेल्या ९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या ९ जणांवर उपचार सुरू केले आहेत. आज आणखी ९ कोरोनाबाधित आढळल्याने नागपूर मनपा क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या ६७ झाली आहे.

कोरोनाच्या संशयावरून काही लोकांना आमदार निवासात क्वॉरंटाइन केले होते. त्यापैकी ९ जणांचे आज रिपोर्ट आले असून हे नऊजण पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. दरम्यान नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे. या ९ पैकी ५ जण शांतीनगर परिसरातील असून हा परिसर सील केला आहे. तसेच या ९ रुग्णांच्या कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनाही क्वॉरंटाइन केले आहे.

संभाव्य धोका टाळण्यासाठी बाधितांच्या कुटुंबीयांचे स्वॅब घेतले असून त्यांनाही कोरोनाची लागण झाली की नाही? याची तपासणी केली जात आहे. तसेच हे नऊ रुग्ण कुणाकुणाच्या संपर्कात आले होते, याचा तपास सुरु आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा