औंध येथील जिल्हा रुग्णालयात १६ रुग्णांना क्वारंटाइन

पुणे: करोना व्हायरसचा कहर जगभरात पसरला आहे. जगभरात करोनाग्रस्तांची संख्या ३ लाखांपेक्षा जास्त झाली आहे. यापैकी १४ हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. आपल्या देशातही ३९० पेक्षा जास्त लोक करोनाग्रस्त असल्याचं समोर आलं आहे तर करोनामुळे ७ लोकांचा मृत्यू झाला आहे. परंतु सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात सापडले आहेत तर चिंतेची बाब ही आहे की पुण्यात सर्वात जास्त रुग्ण सापडले आहेत.

पुणे, मुंबई सारख्या शहरात हा आकडा जास्त वाढत चालला आहे त्याची दक्षता घेत या शहरांमध्ये चाचणी केंद्रे वाढवण्यात आले आहेत. याच बरोबर क्वारंटाइन करण्यासाठी जागा देखील वाढवण्यात येत आहेत. यात आता औंध येथील जिल्हा रुग्णालयात या रुग्णांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. याच बरोबर शहरातील नायडू संसर्गजन्य रुग्णालय, पिंपरी-चिंचवडचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) यांचा ही क्वारंटाइन मध्ये समावेश आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाच्यावतीने पुण्यातील रुग्णांच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. रुग्णांमध्ये किती रुग्ण रुग्णालयात आहेत, किती जणांचे नमुने प्रलंबित आहे किंवा किती रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे याचा लेखाजोखा मांडण्यात येतो. त्या अहवालातून ही माहिती पुढे आली आहे की, करोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या आणि सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणे दिसलेल्या संशयित तसेच ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांपैकी ५४८ जणांच्या घशातील द्रवाची चाचणी ‘निगेटिव्ह’ आली आहे. त्यामुळे ५४८ जणांना घरी सोडण्यात आले आहे. आजमितीला ६०३ पैकी केवळ ५५ रुग्ण रुग्णालयात आहेत. २८ जणांच्या नमुन्यांचे अहवाल अद्याप ‘राष्ट्रीय विषाणू संस्थे’कडून (एनआयव्ही) येणे बाकी आहे.

औंध येथील जिल्हा रुग्णालयात, नायडू संसर्गजन्य रुग्णालय, पिंपरी-चिंचवडचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय तीनही रुग्णालयात एकूण ६०३ जणांना दाखल करण्यात आले आहे. पैकी नायडू रुग्णालयात ४६६ आणि वायसीएम रुग्णालयात १२१ तसेच औंध रुग्णालयात १६ रुग्णांना ठेवण्यात आले. त्यातील एकूण ५४८ जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. उर्वरित ५५ रुग्ण रुग्णालयात असून, त्यात नायडू रुग्णालयातील ३४ जण आहेत. ‘वायसीएम’मध्ये २१ आणि औंध रुग्णालयात १६ जण आहेत. १४ दिवसांसाठी ११७ प्रवाशांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. आजमितीला २ हजार ३९३ जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. ८२१ जणांनी १४ दिवसांचा कालावधी पूर्ण केला आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा