क्षेत्र परमप्रीती महानुभाव आश्रम मनसर येथे त्रैमासिक परमप्रीती महोत्सवाचे आयोजन

नागपूर, २२ फेब्रुवारी २०२४ : जिल्ह्यातील मनसर येथील श्री क्षेत्र परमप्रीती महानुभाव आश्रम येथे त्रैमासिक परमप्रीती महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहीती आचार्य श्री.बांधकर बाबा यांनी पत्रकारांना दिली. या महोत्सवात अधिक माहीती देतांना त्यांनी सांगीतले की, हे आयोजन १० दिवसाचे असून मुख्य सोहळा २३ ते २४ फेब्रूवारी रोजी साजरा केला जाणार आहे. या महोत्सवात राज्यभरातून संत महंत मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

मुख्य महोत्सवाच्या पहिल्या दिवशी आलेल्या संत महंत व आचार्यांचे पूजन करून त्यांची गावात मिरवणूक काढली जाणार आहे. तर रात्री किर्तनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. दुसऱ्या दिवशी ज्याअनुयायांना दीक्षा घ्यायची असेल त्यांना दीक्षा दिली जाणार आहे. यंदा एकुण ११ अनुयायांना दीक्षा दिली जाणार आहे. त्यानंतर आचार्यांचा भेटीगाठीचा सोहळा पार पडणार आहे.

या महोत्सवाला जवळपास २५ हजार भाविक उपस्थित राहणार असून त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. व्यसनमुक्त समाजाची स्थापना हा प्रचार जगभर पसरवण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या पत्रकार परिषदेला महंत न्यायबास बाबा, व्याक्रणाचार्य राजशास्री बांधकर, पुरूषोत्तमजी ठाकरे (अध्यक्ष,अखिल भारतीय महानुभाव परिषद,नागपूर जिल्हा आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महास्थान विकास मंडळ, मनसर), वामनरावजी वानखेडे (अध्यक्ष, कारंजा तालुका महानुभाव मंडळ), आनंदरावजी गजभिये (अध्यक्ष , श्री दत्त मंदीर चँरिटेबल ट्रस्ट नागपूर) हे उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनीधी : नीता सोनवणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा