बारामती, १९ नोव्हेंबर २०२२ : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राहुल गांधींनी दाखविलेल्या पत्राबद्दल व सावरकरांचा इतिहासाबद्दल स्वतःचे मत मांडले. त्याचप्रमाणे राज्यपाल महोदयांनी छत्रपती शिवराय आणि महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या बाबतीत खालच्या पातळीचे वक्तव्य केले होते तेव्हा आंदोलन का करण्यात आले नाही असा सवालही शिंदे गट, भाजप आणि मनसेला केला.
रोहित पवार म्हणाले जेव्हा ‘हरहर महादेव’ चित्रपटात खोटा इतिहास दाखविला गेला, कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान झाला तेव्हा लोक गप्प का बसले, याचे मला आश्चर्य वाटते. तर सावरकरांच्या बाबतीत माझा अभ्यास कमी असल्याने त्यावर मी बोलणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
मात्र सावरकरांचा इतिहास जाणून घेऊन याबाबतही चर्चा झालीच पाहिजे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, आंबेडकर, शाहू महाराज यांचा इतिहास माहिती असल्याने आपण लढतो ती गोष्ट वेगळी आहे. राहुल गांधी यांनी वाचलेल्या पत्रात काय लिहिले आहे, ते जाणून घेण्याएवढेच सावरकरांनी लिहिलेल्या पुस्तकातील शब्द आणि शब्द समजून घेणे आवश्यक आहे, असे रोहित पवार म्हणाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे