प्रवास परवाना मिळावा म्हणून रुग्णालयांबाहेर लागल्या रांगा

पुणे, दि. ४ मे २०२० : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गेले ४० दिवस देश लॉकडाउनमध्ये आहे. त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी स्थलांतरित मजूर, प्रवासी, विद्यार्थी अडकून पडले होते. अखेर त्यांना त्यांच्या गावी पाठवण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला. या निर्णयानंतर मात्र नागरिकांनी परवाना मिळावा यासाठी शहरातील सरकारी रुग्णालयांत गर्दी केली.

आपल्या गावी जाण्याआधी या नागरिकांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. अशातच आज आपापल्या गावी परतण्यास इच्छूक असणाऱ्यांची वैद्यकीय तपासणी सुरु करण्यात आली आहे. पुणे महापालिकेतर्फे ही तपासणी करण्यात येत असून या तपासणी नंतरच त्यांना पुढील प्रवासासाठी परवानगी देण्यात येईल.

नागरिक ज्या तालुक्यांमध्ये अडकले आहेत त्या तालुक्याच्या तहसीलदारांची परवानगी घेऊन त्यांना आपापल्या गावी परत जाता येणार आहे. त्यासाठी तहसील कार्यालयातून नागरिकांना पासेस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय नागरिकांना ऑनलाईन ई मेल करुनही आपापल्या गावी जाण्याची परवानगी घेता येणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा