आर.एन. आगरवाल विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी ‘हास्यकल्लोळ’ कार्यक्रमाचे आयोजन

बारामती: बारामती येथील आर एन आगरवाल विद्यालयात आज शनिवार दि ११ जानेवारी रोजी सकाली शाळेच्या वेळी ‘हास्यकल्लोळ’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. फलटण चे हास्यसम्राट श्री बाळकृष्ण मोरे यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

आर एन अगरवाल टेक्निकल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासा बरोबरच आनंदी राहणे मनसोक्त हसने हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. असे मोरे यांनी सांगितले विद्यार्थी स्पर्धेच्या युगात रोजच्या अभ्यासामुळे विद्यार्थ्यांच्यात ताण तणाव वाढत चालला आहे.यासाठी विद्यार्थी व शिक्षक यांच्या मधील ताण तणाव कमी करून हसून आनंदाने जीवन जगले पाहिजे या बद्दल मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम जवळजवळ दीड तास चालला होता यामुळे विद्यार्थी हास्यकल्लोळ कार्यक्रमात खूप खुश दिसत होते. बाळकृष्ण मोरे यांच्या हस्ते लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्प हार अर्पण करण्यात आला. आज लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी असल्याने विद्यार्थी व शिक्षकांनी त्याच्या बद्दल मनोगत व्यक्त केली. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्रा. राजेंद्र काकडे होते.तर यावेळी अर्जुन मोहिते, विष्णू बाबर, बंडू पवार, अर्जुन मलगुंडे व सर्व शिक्षक व कर्मचारितार यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रदीप पळसे यांनी केले होते तर कार्यक्रमाचे आभार उर्मिला भोसले यांनी केले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा