पुणे, ७ ऑगस्ट २०२३ : भारताचं राष्ट्रगीत ‘जन गण मन’ याची रचना ज्यांनी केली असे महान कवी म्हणजेच रवींद्रनाथ टागोर यांची आज पुण्यतिथी. पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी आणि संगीतकार म्हणून रवींद्रनाथ टागोर यांचा नावलौकिक आहे. तसेच नोबेल पुरस्कार मिळवणारे आशिया खंडातील ते पहिले नागरिक होते. त्यांनी लिहिलेल्या ‘गीतांजली’ या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. रवींद्रनाथ यांनी वयाच्या आठव्या वर्षी पहिली कविता लिहिली. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी भानुसिंह या टोपणनावाने बऱ्याचशा कविता लिहिल्या. ब्रिटीश सरकारकडून त्यांना सर हा किताब दिला होता. पण जालियानवाला बाग हत्याकंडामुळे त्यांनी हा किताब सरकारला परत दिला होता.
१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि २० व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्य आणि संगीतात आमूलाग्र बदल घडून आला. १९१३ मध्ये नोबेल पारितोषिक जिंकणारे जगातील पहिले गैर-युरोपियन आणि साहित्यातील पहिले गीतकार होते. एक मानवतावादी, सार्वभौमवादी, आंतरराष्ट्रीयवादी म्हणून त्यांनी ब्रिटिश राजवटीचा विरोध केला. शांतिनिकेतनाची उभारणी, विस्तृत आणि उच्च दर्जाच्या साहित्याची निर्मिती आणि रवीन्द्रसंगीताचे सृजन हे रवींद्रनाथांचे प्रमुख जीवनकार्य होते. संत तुकारामांच्या साहित्याचा त्यांनी अभ्यास केला होता. संत तुकारामांचे काही अभंग त्यांनी बंगाली भाषेत अनुवादित केले आहेत. संगीत, साहित्य, तत्त्वज्ञान, चित्रकला ,नृत्य ,शिक्षण अशा बहुविध क्षेत्रात रवींद्रनाथांनी काम केले. संख्या व दर्जा या दोन्ही कसोट्यांवर रवींद्रनाथांची निर्मिती खरी उतरते. महात्मा गांधी यांना रवींद्रनाथ टागोरांच्याबद्दल प्रचंड आदर होता. त्यांनीच टागोर यांना गुरूदेव अशी उपाधी दिली. रविंद्रनाथ टागोर यांनी ७ ऑगस्ट १९४७ साली कोलकात्यात अखेरचा श्वास घेतला.
रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म ७ मे १८६१ ला कोलकात्यातील जोडासाको ठाकूरवाडी या गावातील एका प्रसिद्ध बंगाली कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव देवेंद्रनाथ टागोर व आईचे नाव शारदाबाई होते. ते आपल्या आई वडिलांच्या १३ अपत्यामध्ये सर्वात लहान होते. लहान असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. देवेंद्रनाथ टागोर हे ब्रह्म समाजाचे वरिष्ठ नेता व त्यांच्या परिसराचे प्रमुख होते. त्यांना आपल्या कामानिमित्त नेहमी प्रवास करावा लागत असे. ज्यामुळे लहान रवींद्रनाथ टागोर यांचे पालनपोषण त्यांच्या नोकरांनी केले. टागोर लहानपणापासूनच बुद्धिमान होते, अभ्यासात त्यांची आवड होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोलकात्यातील सेंट जेवियर या शाळेत झाले. टागोरांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी बॅरिस्टर बनावे. परंतु रवींद्रनाथ टागोर यांनी आवड साहित्यात होती. १९७८ साली बॅरिस्टर ची डिग्री मिळवण्यासाठी, त्यांच्या वडिलांनी त्यांचा प्रवेश लंडनमधील विश्व विद्यालयात केला. परंतु बॅरिस्टरच्या अभ्यासात आवड नसल्याने १८८० साली ते डिग्री न घेताच परत आले.
लंडनमध्ये त्यांना पाश्चिमात्य संगीत आणि नृत्य तसेच अन्य कलांचा अविष्कार पाहायला मिळाला. त्यानंतर ते भारतात परतले. लहानपणापासून रवींद्रनाथ टागोर कविता आणि कथा लिहायचे. रवींद्रनाथ टागोर यांनी साहित्यामध्ये दोन हजारांहून अधिक रचना केल्या आहे. इंग्लंड मधून भारतात परत आल्यावर त्यांनी विवाह करून सिआल्दा येथे आपल्या इस्टेट वर काही वर्ष घालवले. त्यांनी दूर दूर पर्यंत पसरलेल्या आपल्या इस्टेटीचे दौरे केले. ग्रामीण व गरीब लोकांचे जीवन जवळून पाहिले. १८९१ ते १८९५ या कालखंडात त्यांनी ग्रामीण बंगालच्या पृष्ठभूमीवर आधारित अनेक लघु कथा लिहिल्या. वर्ष १९०१ साली रवींद्रनाथ टागोर शांतिनिकेतनला गेले. येथे त्यांनी एक ग्रंथालय, शाळा व पूजा स्थळाचे निर्माण केले. त्यांनी येथे अनेक झाडे लावून सुंदर बगीचा तयार केला. येथेच काही दिवसानंतर त्यांची पत्नी व मुलांची मृत्यू झाले. त्यांच्या वडिलांचे ही १९०५ साली निधन झाले.रवींद्रनाथ टागोर यांनी साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल नोबेल पारितोषिक देण्यात आले. नोबेल पुरस्कार देणारी संस्था स्वीडिश अकॅडमी ने त्यांचे काही अनुवाद व गीतांजली या ग्रंथाच्या आधारवर त्यांना हा पुरस्कार दिला. इंग्रज शासनानेही १९१५ साली त्यांना ‘नाईट हुड’ ची उपाधी दिली. परंतु जालियनवाला बाग हत्याकांड नंतर त्यांनी ही उपाधी परत केली.
रवींद्रनाथ टागोर जन्मजात बुद्धिमान होते. एक महान कवी, साहित्यिक, लेखक, चित्रकार आणि समाजसेवी होते. सांगितले जाते की बाल्य काळात त्यांनी आपली पहिली कविता लिहिली होती. ज्या वेळी त्यांनी पहिली कविता लिहिली तेव्हा त्यांचे वय मात्र ८ वर्ष होते. १८७७ साली सोळा वर्षाच्या वयात त्यांनी लघुकथा लिहून टाकली. रवींद्रनाथ टागोर यांनी जवळपास २२३० गीत लिहिले. ते भारतीय संस्कृतीत व विशेषतः बंगाली संस्कृतीत विशेष योगदान देणारे साहित्यिक होते. रवींद्रनाथ टागोर यांनी भारत व बांगलादेश साठी राष्ट्र गीत लिहिले. आज भारताचे राष्ट्र गीत जन गण मन हे प्रत्येक महत्त्वपूर्ण वेळी गायीले जाते. या शिवाय बांगलादेशाचे राष्ट्रीय गीत ‘आमार सोनार बांग्ला’ हे देखील रवींद्रनाथ टागोर यांनीच लिहिले आहे. या शिवाय रवींद्रनाथ टागोर आपल्या आयुष्यात तीन वेळा अल्बर्ट आईन्स्टाईन या महान शास्त्रज्ञांनाही भेटले. ते रवींद्रनाथ टागोरांना ‘रब्बी टागोर’ म्हणत असत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे