पुणे, ३० डिसेंबर २०२०: महाराष्ट्रात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या घटना वाढतच चालल्या आहेत. त्याही अश्या विकृतीला पोहचले आहेत जिथे मानवता म्हणजे काय? खरंच माणसांत आता माणुसकी राहीली आहे का? असा प्रश्न उभा राहिला आहे. महाराष्ट्रातील दोन वेगवेगळ्या शहरांत मन हेलावून टाकणार्या घटना घडल्या आहेत.
नवर्यानेच बायकोच्या गुप्तांगमधे टाकले केबल राॅड……
महाराष्ट्रातील महत्वाचे शहर म्हणून ओळखलं जाणार्या पुण्यात ही महिलेवर होणार्या अत्याचारात वाढच होत आहे. लग्नानंतर मुलीच्या सर्वात जवळचा व्यक्ती कोणी असेल तर तो म्हणजे तिचा नवरा. पण, या काळात जीवापाड प्रेम करणारा नवराच जिवावर बेतु लागला तर काय? अशीच एक घटना पुण्यातील बोपोडी परिसरात घडली आहे.
माहेरून एक लाख रूपये आणण्यासाठी नवरा इम्तियाज चौधरी बायकोला त्रास देऊ लागला. एवढ्यावरच न थांबता माहेरून तु पैसे का आणत नाही म्हणून त्याने बायको बरोबर अनैसर्गिक संभोग केला आणि एवढं करूनही नराधमाचे भागलं नाही तर त्याने पत्नीच्या गुप्तांगात केबल राॅड घातला. यामुळे पत्नी गंभीर जखमी झाली. नंतर पिडितेच्या फिर्यादी वरून पती इम्तियाज आणि त्याच्या घरच्यांनवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
६० वर्षीय वृद्धेवर बलात्कार….
अहमदपुर मधे एका ४० वर्षीय पुरूषांने एका ६० वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किशन रेनुदास उगाडे असे नराधमाचे नाव आसून नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पिडितेच्या सुनेने २८ तारखेला फिर्याद दिली होती. आरोपी नराधमाने वृद्धेला बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे पिडितेने नदीत उडी देऊन आत्महत्या केली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव