राधाकिशन दमानींच्या डी मार्टने मारुती, एल अँड टी सारख्या अनेक मोठ्या कंपन्यांना टाकले मागे

मुंबई, १७ जून २०२१: अवेन्यू सुपरमार्ट ज्याची मालकी व संचलन डी मार्ट कडे आहे. अवेन्यू सुपरमार्ट ब्लू चिप कंपन्या जसे की मारुती सुझुकी, लार्सन अँड टुब्रो, अल्ट्राटेक सिमेंट, ओएनजीसी यांसारख्या कंपन्यांना मार्केट कॅप च्या बाबतीत मागे टाकले आहे. राधाकिशन दमानी यांच्या कंपनीने मार्केट कॅप मध्ये २.१७ लाख कोटी रुपयांवर झेप घेतली आहे. यामुळं त्यांची कंपनी अॅक्सिस बँक नंतर भारतातील सतरावी सर्वात मोठी कंपनी ठरली आहे.
२०१७ मध्ये सूचीबुद्ध झालेल्या या कंपनीने अवघ्या चार वर्षात १००० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. कंपनी लिस्ट होतेवेळी डी मार्ट च्या शेअर्सची किंमत २९५-२९९ या प्राइस बँड मध्ये होती. कंपनी सूचीबद्ध होतेवेळी कंपनी चे मार्केट कॅप ४०,००० कोटींपेक्षा कमी होते. कंपनी सूचिबद्ध झाल्यानंतर एका दिवसातच गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले होते. २०२१ मध्ये देखील शेअर्सच्या किमती मध्ये २१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
दमानी यांच्या संपत्तीने १८ बिल्लियन डॉलर्सचा आकडा गाठला आहे. १ जानेवारी २०२१ पासून त्यांची संपत्ती ३.१ बिल्लियन डॉलर्सने वाढली आहे.  डी मार्ट मुख्यत्वे आपल्या काम करण्याच्या आणि वितरण व्यवस्थेमध्ये ताळमेळ राखत वस्तूंच्या किमती आकर्षक ठेवण्यावर लक्ष केंद्रित करते. कंपनी पूर्ण वर्ष वस्तूंमध्ये मोठ्या प्रमाणावर डिस्काउंट देत असते ज्यामुळे प्रतिस्पर्धी कंपन्यांना सहज मागे टाकते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा