नाशिक, दि.२०मे २०२०: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात ४ था टप्पा सुरु करण्यात आला. आतापर्यंत राज्य पोलीस दल, महाराष्ट्र पोलीस अहोरात्र कार्यरत असून सेवा करतांना काही पोलीस अधिकारी व कर्मचारीही कोरोना बाधित झाले आहे.
राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांवर असलेला भार कमी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडे अतिरिक्त केंद्रीय सुरक्षा दलाची मागणी केली होती.
याच अनुषंगाने संपूर्ण राज्यात एकूण १० तुकड्या दाखल झाल्या आहे. नाशिक शहरात १३० जवानांची एक तुकडी दाखल झाली. नाशिक शहर अद्यापही रेड झोनमध्ये असल्याने पोलिसांच्या मदतीला केंद्रीय सुरक्षा बलाची तुकडी आता कार्यरत राहणार आहे.
शहरातील संवेदनशील भागात आरएएफच्या (रॅपिड ऍक्शन फोर्स ) तुकडीने जुन्या नाशिक परिसरात संचलन केले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या मदतीसाठी आरएएफ, क्यूआरटी, एसआरपी, भद्रकाली पोलीस आणि होमगार्ड आदींनी परिसरात संचलन केले.
भद्रकाली, दूध बाजार, चौक मंडई, बागवान पुरा, आझाद चौक, चव्हाट ,नानावली आदी परिसरात संचलन केले. यावेळी पोलीस उपायुक्त अमोल तांबे , सहायक पोलिस आयुक्त मगलसींग सूर्यवंशी आदी अधिकरी उपस्थित आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: