गोल पोस्ट आंतरराष्ट्रीय राफेल नदाल आणि रॉजर फेडरर हे टेनिस मधील लीजेंड ; नोवाक जोकोविच

राफेल नदाल आणि रॉजर फेडरर हे टेनिस मधील लीजेंड ; नोवाक जोकोविच

सर्बिया , २१ जून २०२० : टेनिस मधील जगातील पहिल्या क्रमाकाचा खेळाडू नोवाक जोकोविच म्हणतो की स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर व स्पेनचा राफेल नडाल यांच्यात जोरदार स्पर्धा आहे त्यामुळे टेनिसचा प्रसार व जहिरात करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आमच्या तिन्हीपैकी सर्वोत्तम बनण्याची शर्यत. ते दोघे माझ्यासाठी साठी लिजेंड आहेत.

जोकोविच पुढे म्हणाला की, नदाल आणि फेडरर हे टेनिसचे दिग्गज आहेत. तो या दोघांकडून नेहमीच प्रेरणा घेतो. जोकोविच हेही म्हणाला की, आज ज्या प्रकारचे खेळाडू आहेत ते सर्व या दोन महान खेळाडूंमुळचे झाले आहेत.

फेडरर-नदालने जे केले तो इतिहास आहे’ जगातील प्रथम क्रमांकच्या जोकोविचने टेनिस चॅनलला सांगितले की, “रॉजर आणि राफेलने जे केले तो इतिहास आहे.” तो नेहमी मला प्रेरणा देतो. मी हे दहा लाख वेळा बोललो आहे आणि पुढेही म्हणत राहीन. मी आज ज्या प्रकारचे खेळाडू आहेत,ते त्या दोघांमुळेच. ते दोघेही नेहमीच मला उत्कृष्ट होण्यास प्रेरित करतात. ”

मला विश्वास आहे की आपल्या तिन्हीपैकी सर्वोत्कृष्ट होण्याची स्पर्धा ही आमच्या खेळाची सर्वात मोठी जाहिरात आहे. टेनिसच्या आजच्या आणि आगामी पिढ्यांसाठी हे उत्कृष्ट आहे. मला आशा आहे की आम्ही एक सकारात्मक उदाहरण उभे करू. त्याचबरोबर, ज्यांना सर्वोत्कृष्ट बनण्याची इच्छा आहे अशा तरुणांसाठी आपण प्रेरणा बनण्यास सक्षम होऊ. मला हा खेळ खूप आवडतो. मी या खेळासाठी खूप उत्कट आणि समर्पित आहे. जोपर्यंत मला ही भावना आहे, तोपर्यंत मी खेळतच राहीन. ”

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version