चंद्रमुखी २’ मधील राघव लॉरेन्सचा फर्स्ट लूक रिलीज, सप्टेंबर २०२३ मध्ये होणार चित्रपट रिलीज

मुंबई, ३१ जुलै २०२३ : दाक्षिणात्य चित्रपट अभिनेता राघव लॉरेन्सचा आगामी चित्रपट ‘चंद्रमुखी २’ मधील फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. फर्स्ट लूक पोस्टरमध्ये राघव लॉरेन्सची वेट्टायनच्या भूमिकेत वेगळीच स्टाईल पाहायला मिळत आहे. चित्रपटातील राघव लॉरेन्सचा फर्स्ट लूक रिलीज करून निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही उघड केली आहे.

लायका प्रॉडक्शनने आज, सोमवारी त्यांच्या ट्विटर हँडलवर ‘चंद्रमुखी २’ या आगामी चित्रपटातील राघव लॉरेन्सचा पहिला लूक शेअर केला. चित्रपटाच्या फर्स्ट लूक पोस्टरमध्ये, वेट्टय्यानपासून बनलेला राघव लॉरेन्स राजाच्या गेटअपमध्ये दिसत आहे. पी. वासू दिग्दर्शित ‘चंद्रमुखी २’ हा चित्रपट गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

‘चंद्रमुखी २’ चित्रपटाचे दिग्दर्शन पी.वासू यांनी केले आहे, तर सुबास्करन यांनी लायका प्रोडक्शनच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात राघव लॉरेन्ससोबत बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट सप्टेंबर २०२३ मध्ये हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होईल. २००५ रोजी आलेल्या ‘चंद्रमुखी’ चित्रपटाचा ‘चंद्रमुखी २’ सीक्वेल आहे. या चित्रपटात सुपरस्टार रजनीकांत यांची महत्त्वाची भूमिका होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा