गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा रहस्य दीपिकाच्या फिटनेसचं…

रहस्य दीपिकाच्या फिटनेसचं…

सध्या बॉलिवूडमधल्या फिट अभिनेत्रींपैकी दीपिका पदुकोण हिचे नाव सध्या आघाडीवर आहे. आपल्या फिटनेसबाबत ती नेहमी योग्य ती काळजी घेते. तिच्या परफेक्ट फिटनेसचं नेमकं रहस्य काय? हे आज जाणून घेऊ या …

दीपिकाच्या डाएटबाबत बोलायचे झाले तरी ती दिवसभरातून ती ६ वेळा थोड-थोड्या प्रमाणात खाते. मात्र यात फक्त हेल्दी अन्न पदार्थांचा समावेश असेल याची ती विशेष काळजी घेते.
दीपिकाच्या दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने होते. ती सकाळी १ ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मध आणि लिंबाचा रस टाकून हे पाणी पिते. त्यानंतर ब्रेकफास्टमध्ये २ अंडी, २ बदाम, १ कप लो फॅट मिल्क, २ इडल्या किंवा २ प्लेन डोसा किंवा उपमा याचा ती समावेश करते.
तसेच दुपारचे जेवनाअगोदर ती ताजी फळं खाते. तर दुपारच्या जेवणात घरीच बनवलेली डाळ-भात, भाजी, सलाड आणि दही याचा समावेश असतो. तर कधी कधी प्रोटीनसाठी ती ग्रील फिश खाते.
संध्याकाळचा नाश्तामध्ये ती फिल्टर कॉफी, नट्स आणि काही फळं खाते. तर रात्रीच्या जेवणात भाजी-चपाती, फ्रेश ग्रीन सलाड याचा समावेश असतो. या शिवाय बॉडी हायड्रेशनसाठी ती नारळ पाणी किंवा मग फ्रुट ज्यूस पिते. तर डेझर्टमध्ये डार्क चॉकलेटला तिची पसंती असते.
एकंदरीत सांगायचे झाले तर दीपिकाचा डाएट प्लान हा सिनेमाच्या गरजेनुसार असतो. ती यात वेळोवेळी बदल करते. असेच म्हणावे लागेल.

error: Content is protected !!
Exit mobile version