IPL 2022, Mega Auction, 22 जानेवारी 2022: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या मेगा लिलावापूर्वी, दोन नवीन संघांनी त्यांचे संबंधित ड्राफ्ट घोषित केले आहेत. यावेळी अहमदाबाद आणि लखनौचे संघ प्रथमच आयपीएलमध्ये सहभागी होत असून शुक्रवारी दोन्ही संघांनी त्यांच्या तीन खेळाडूंची घोषणा केली.
सध्या दक्षिण आफ्रिकेत एकदिवसीय संघाचं नेतृत्व करत असलेल्या केएल राहुलला लखनऊ संघाचे कर्णधारपद देण्यात आलंय, तर टीम इंडियातून बाहेर पडणाऱ्या हार्दिक पांड्याकडं अहमदाबादचं कर्णधारपद मिळालंय.
◾अहमदाबाद आयपीएल संघ:
हार्दिक पांड्या (कर्णधार, 15 कोटी)
राशिद खान (15 कोटी)
शुभमन गिल (8 कोटी)
◾लखनौ आयपीएल संघ:
केएल राहुल (कर्णधार, 17 कोटी)
मार्कस स्टॉइनिस – 9.2 कोटी
रवी बिश्नोई – 4 कोटी रु
या ड्राफ्टसह, अहमदाबादने आता 38 कोटी रुपये खर्च केले आहेत, त्यामुळं त्याच्याकडं 52 कोटी रुपये शिल्लक आहेत ज्यासह ते आयपीएलच्या मेगा लिलावासाठी जाईल. त्याचबरोबर लखनौच्या टीमने 30.2 कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यांच्या खिश्यात 58 कोटी रुपये शिल्लक आहेत.
आयपीएल 2022 मध्ये एकूण दहा संघ सहभागी होत आहेत, जुन्या आठ संघांना खेळाडूंना कायम ठेवण्याची संधी मिळाली. तर अहमदाबाद, लखनौला मेगा लिलावापूर्वी प्रत्येकी तीन खेळाडू जोडण्याची संधी मिळाली. आता सर्व संघांनी आपापल्या खेळाडूंची नावे जाहीर केल्याने मेगा लिलावाचा मार्ग मोकळा झाला आहे.
यावेळी दोन्ही संघ आयपीएलमध्ये जोडले गेले आहेत
लखनौचा संघ संजीव गोयंका ग्रुपने 7090 कोटी रुपयांना विकत घेतला, जो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा संघ आहे. तर अहमदाबादचा संघ सीव्हीसी कॅपिटल ग्रुपने 5665 कोटी रुपयांना विकत घेतला. दोन्ही संघांच्या विक्रीतून बीसीसीआयला 12 हजार कोटींहून अधिक कमाई झाली.
हार्दिक पांड्या काही काळापासून खराब फॉर्म आणि फिटनेसशी झुंजत होता. सुरुवातीपासून मुंबईशी संबंधित असतानाही त्याला मुंबई इंडियन्सने कायम ठेवलं नाही. रशीद खानच्या बाबतीतही असंच झालं, त्याच्या संघ सनरायझर्स हैदराबादने त्याला कायम ठेवलं नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे