‘भारत जोडो’ यात्रेत राहुल गांधी दिसले अनोख्या अंदाजात!

महू, २७ नोव्हेंबर २०२२ काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला आज सकाळी मध्य प्रदेशातील महू येथून सुरुवात झाली. राज्यातील यात्रेचा आज पाचवा दिवस आहे. दरम्यान, राहुल गांधी पदयात्रेचे नेतृत्व करतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये राहुल गांधी यांचा अनोखा अंदाज पाहायला मिळत आहे.

या व्हिडिओमध्ये राहुल गांधी बाईक चालवताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी डोक्याला हेल्मेट घातले. त्यांना बाईक चालवताना पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. गर्दीला पांगवण्यासाठी पोलीस दलालाही घाम फुटला होता. गर्दीला बाजूला करून राहुल गांधींना रस्ता मोकळा करून द्यावा लागला आहे.

राहुल गांधींच्या स्वागतासाठी यात्रामार्गावर बायपासजवळ लाल गालिचा अंथरण्यात आला होता. तसेच, रंगीबेरंगी कागद उडवून राहुल गांधींचे भव्य स्वागत करण्यात आले.
यापूर्वी देखील राहुल गांधी पदयात्रे दरम्यान, आदिवासींसोबत नृत्याचा आनंद लुटताना, लहान मुलांसोबत धावण्याची शर्यत लावताना दिसले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा