राहुल गांधींनी गुलमर्गमध्ये लुटला स्की स्लोपचा आनंद; सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ व्हायरल

श्रीनगर, १६ फेब्रुवारी २०२३ :काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नुकतीच संपली असून, सध्या राहुल गांधी गुलमर्गमध्ये आहेत. गुलमर्गमध्ये त्यांनी बुधवारी स्कीइंगचाही आनंद लुटला. तसेच प्रसिद्ध गोंडोला केबल कारची राईड घेतली. तर आज, गुरुवारी त्यांचा बर्फावरून स्की रन खेळ खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी गुलमर्गमध्ये गोंडोलो केबल कार चालवली, त्यानंतर त्यांनी स्कीइंगचा आनंद घेतला. तसेच तिथे फिरायला आलेल्या अनेक पर्यटकांसोबत राहुल गांधी यांनी फोटोदेखील काढले आहेत. दरम्यान, फरहात नाईक या युजरने राहुल यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, भारत जोडो यात्रेच्या यशानंतर राहुल गांधी गुलमर्गमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहेत.

गुलमर्ग येथे राहुल गांधी हे खासगी दौऱ्यावर असून ते काश्मीर खोऱ्यातील एका खासगी कार्यक्रमाला देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा