राहुल गांधींनी तोडले पुन्हा एकदा अकलेचे तारे ; विरोधकांकडून जोरदार टीका !

54
Rahul Gandhi News Rahul Gandhi Tweet Rahul Gandhi X Chatrpati Shivaji Maharaj Jayanti 2025
राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना शुभेच्छा देताना आदरांजली वाहण्याऐवजी 'श्रद्धांजली' वाहिली आहे.

Rahul Gandhi Shivjaynti २०२५ : आज सगळीकडे शिवजयंतीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरी होत आहे. शिवप्रेमींपासून ते राजकारण्यांपर्यंत सर्व स्तरावरील लोकांनी मोठ्या जल्लोषात शिवजयंती साजरी करत जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आता यामध्ये एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना शुभेच्छा देताना आदरांजली वाहण्याऐवजी ‘श्रद्धांजली’ वाहिली आहे. त्यांनी केलेलं ऑफीशियल ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

त्यांनी असे लिहिले आहे की, “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र ‘श्रद्धांजली’ अर्पण करतो. आपल्या धैर्याने आणि शौर्याने त्यांनी आम्हाला निर्भयतेने आणि पूर्ण समर्पणाने आवाज उठवण्याची प्रेरणा दिली आहे. त्यांचे जीवन आपल्यासाठी प्रेरणादयी राहील.”असे ट्वीट केले आहे. या केलेल्या ट्वीटवर विरोधीपक्ष नेत्यांनी राहुल गांधीवर जोरदार टीका सुरू केली आहे.

भाजप आमदार अतुल भातखळकर म्हणणात , जयंती दिवशी आदरांजली व्यक्त केली जाते. पण राहुल गांधी हे नेहमी देशातल्या आणि प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या महापुरुषयांविषयी कळत नकळत अनादार व्यक्त करत असतात. ही पोस्ट त्यांनी ही पोस्ट तात्काळ मागे घ्यावी. त्यांनी श्रद्धांजली या शब्दाऐवजी आदरांजली हा शब्द वापरावा अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असा इशारा भातखळकर यांनी दिला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा