नवी दिल्ली, ७ ऑगस्ट २०२३ : मोदी आडनाव प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरात ट्रायल कोर्टाने दोन वर्षाची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने हा निर्णय कायम ठेवला होता. त्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देत ट्रायल कोर्ट आणि उच्च न्यायालयातला फटकारले आणि राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानंतर राहुल गांधी यांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. आता राहुल गांधी संसदेच्या अधिवेशनात दिसणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सत्य मेव जयते म्हणत राहुल गांधी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे सुमारे साडेचार महिन्यानंतर राहुल गांधी यांना त्यांची काढून घेण्यात आलेली खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली आहे. सध्या केंद्र सरकारचे पावसाळी अधिवेशन चालू आहे. त्यामुळे राहुल गांधी आता संसदेच्या अधिवेशनात सहभागी झालेले पाहायला मिळणार आहेत.
राहुल गांधी यांना खासदारकी बहाल करण्याची अधिसूचना काढण्यात आली आहे. यामध्ये संपूर्ण गोषवारा देण्यात आला आहे. राहुल गांधी यांची २४ मार्च रोजी खासदारकी रद्द करण्यात आली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाचा नवा आदेश दिला आहे. राहुल गांधी यांना खासदारकी बहाल करण्यात आली आहे, असे या अधिसूचनेत नमूद केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर