राहुल गांधी दोन दिवस गोवा दौऱ्यावर

6

पणजी, २ ऑगस्ट २०२३ : गोवा राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सुरू झालेला वाद मिटविण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी हे दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर येत आहेत. आज रात्री ते गोव्यात दाखल होणार असून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. उद्या राज्यातील विविध भागांना भेट देऊन नागरिक, व्यावसायिकांशी चर्चा करणार आहेत.

प्रदेश काँग्रेसने पाच निष्ठावंत नेत्यांना निलंबित केले होते. यात जनार्दन भंडारी सारख्या राहुल गांधीशी जवळीक असलेल्या नेत्यांचाही समावेश आहे. आपल्या निलंबनानंतर भंडारी यांनी राहुल गांधींकडे तक्रार केली असावी व त्यामुळे राहुल गांधी तातडीने गोव्यात यावे लागले असावे. ते गोव्यातील काँग्रेसच्या नेत्यांची कान उघाडणी करुन जनार्दन भंडारी व इतर नेत्यांवरील निलंबन मागे घेण्यास सांगू शकतील, असा कयास व्यक्त होत आहे.

दुसरीकडे लोकसभा निवडणूक जवळ येत असल्याने काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी विविध राज्यांचे दौरे करण्यास सुरुवात केलेली आहे. राहुल गांधी आज रात्री दहा वाजता मोपा विमानतळावर दाखल होतील. उद्या काही भागांचा दौरा करतील.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा