“बिहार निवडणुकीच्या वेळी राहुल गांधी शिमल्यात लुटत होते पिकनिकची मजा”

नवी दिल्ली, १६ नोव्हेंबर २०२०: बिहारमधील राजकीय पारा पुन्हा चढू लागला आहे. आधी एनडीएमध्ये सुशील मोदींचं उपमुख्यमंत्रीपद गेलं. आता राष्ट्रीय जनता दलाचे ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला आहे. राहुल गांधींच्या कार्यशैलीमुळे भाजपला मदत मिळतेय, असा गंभीर आरोप शिवानंद तिवारी यांनी केला. ते म्हणाले की, “बिहार निवडणूक सुरु असताना राहुल गांधी शिमला या ठिकाणी गेले होते. पिकनिकचा आनंद लुटत होते. पक्ष अशा प्रकारे चालवला जातो का? राहुल गांधी यांच्या कार्यशैलीमुळे भाजपाला मदतच होते आहे” असा आरोप शिवानंद तिवारी यांनी केला आहे.

काँग्रेस पक्ष महाआघाडीसाठी अडथळा बनला आहे. काँग्रेसने ७० उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. पण ७० सभाही घेतल्या नाहीत. राहुल गांधी बिहारमध्ये फक्त तीन दिवसांसाठी आले. प्रियांका गांधी तर आल्याच नाहीत. कारण बिहारशी त्यांचा फारसा परिचय नाही, असं शिवानंद तिवारी म्हणाले.

बिहारमध्ये निवडणूक रंगात आली असताना आणि प्रचार शिगेला पोहोचला असताना राहुल गांधी शिमलामधील प्रियांका गांधींच्या घरी पिकनिक करत होते. अशाप्रकारे पक्ष चालतो का? काँग्रेस पक्ष ज्या पद्धतीने चालवला जात आहे, त्याचा पूर्ण फायदा भाजपला होत आहे, असं म्हणत शिवानंद तिवारी यांनी काँग्रेसला सुनावलं.

राहुल गांधी यांच्या घरी बैठक झाली होती. या बैठकीत कपिल सिब्बल, शशी थरूर, मुकुल वासनिक, मनीष तिवारी हे सर्व वरिष्ठ नेते बसले होते. प्रत्येकाने पत्र लिहिलं. हे सर्व आयुष्यभर काँग्रेसचे निष्ठावान नेते. पण अशाप्रकारे पक्ष चालवू शकत नाही. असा पक्ष चालवतात का? काँग्रेसचा ज्या प्रकारे कारभार सुरू आहे त्याचा फायदा भाजपाला होत आहे, असं तिवारी म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा