नवी दिल्ली, दि. २३ मे २०२०: लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या प्रवासी मजुरांच्या अडचणींसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी सतत केंद्र सरकारवर हल्ला करत आहेत. लॉकडाऊनमुळे मोठ्या संख्येने कामगारांना पायीच आपापल्या राज्यात परत जावे लागले. १६ मे रोजी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुखदेव विहार उड्डाणपुलाजवळ या मजुरांशी संवाद साधला. राहुल गांधींनी आज सकाळी आपल्या यूट्यूब वाहिनीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. १७-मिनिटांचा हा व्हिडिओ प्रवासी मजुरांच्या स्थलांतराची वेदना दर्शवणाऱ्या दृश्यांसह प्रारंभ होतो.
नंतर लोकांना त्यांच्या वेदना सांगण्यात आल्या आहेत. झाशी येथील रहिवासी महेश कुमार म्हणतात की ते १२० किमी गेली चालले आहेत. रात्री थांबलो आणि पुढे निघालो. आम्हाला पायी जाण्यास भाग पाडले गेले आहे. आणखी एक महिला सांगते, श्रीमंत आणि मोठ्या लोकांना याचा कोणताही त्रास होत नाही. परंतु आम्ही तीन तीन दिवस पायी चालत आहोत, उपाशी राहत आहोत केवळ आम्हीच नाही आमच्या बरोबर लहान मुले देखील आहे त्यांची देखील अशीच उपासमार होत आहे. आणखीन एक महिला सांगते की, आम्ही जे काही कमावले होते ते मागील दोन महिन्यात गमावले आहे. आता गावाला जाण्यासाठी आमच्याकडे कोणतेही पैसे शिल्लक नाहीत. इथे राहण्यासाठी पैसे शिल्लक नाहीत त्यामुळे पायी चालत जाणे हा एकच पर्याय आहे.
राहुल गांधी एका मजुराशी बोलतात. ते कोठून येत आहेत आणि काय करतात हे विचारतात. तो माणूस सांगत आहे की तो हरियाणाहून आला आहे आणि बांधकाम साइटवर काम करायचा. त्या व्यक्तीचे म्हणणे आहे की त्याने एक दिवस अगोदर चालणे सुरू केले. त्याचे संपूर्ण कुटुंब त्याच्याबरोबर आहे. त्या व्यक्तीने सांगितले की आपल्याला लॉकडाऊनबद्दल माहिती मिळाली. ते जिथे राहत होते तिथे त्यांना भाड्याच्या नावाखाली २५०० रुपये द्यावे लागले. त्यामुळे तो झांसीला रवाना होत आहे. राहुल गांधींनी विचारले आहे की जवळ पैसे आहेत,
प्रवासात जेवत आहेत का? या प्रश्नाला उत्तर देताना कुटुंबीयांनी सांगितले की लोक त्यांना वाटेत खायला देतात. बराच वेळा खाण्यासाठी मिळते तर कधी कधी मिळत नाही त्या वेळेस तसेच उपाशी पुढे निघावे लागते.
राहुल गांधी दिल्लीतील रस्त्यांवर मजुरांना भेटण्यासाठी बाहेर निघाले होते. या वेळेस त्यांना मजुरांविषयी भयावह सत्य पाहण्यास मिळाले. लोकांशी बोलताना त्यांना मजुरांविषयी अनेक धक्कादायक गोष्टी ऐकायला मिळाल्या. सातशे किलोमीटर लांब चालण्यासाठी हे मजूर निघाले आहेत. केवळ इतकेच नाही तर पूर्ण देशांमध्ये मजुरांची हीच परिस्थिती आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी