राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल, तर विराटचे एकत्र राहण्याचे ट्विट…..

नवी दिल्ली, ४ फेब्रुवरी २०२१: दिल्लीत केंद्र सरकारच्या कृषी कायद्या विरोधात शेतकर्यांचे आंदोलन सुरू आहे. ज्यामधे देशातील अनेक लोक या मधे शेतकर्यां बरोबर आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील शेतकर्यांनी आंदोलन उभारल्या पासून त्यांच्या सोबत असल्याचे दिसत आहे. तर वेळोवेळी केंद्र सरकारला ते धारेवर धरून प्रश्न विचारून जाब मागत आहेत. आता राहुल गांधींनीपुन्हा एकदा सरकारवर तोफ डागली आहे.

‘मोदी सरकार शेतकर्यांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आसल्याचा आरोप गांधी यांनी केला आहे. शेतकरी देशाचे शत्रू आहेत का?’ असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला आहे. जे चालले आहे ते शेतकर्यांच्या हिताचे नाही, शेतकरी देशाची शक्ती आहे. असही ते म्हणाले. राहुल गांधी यांच्या आरोपावरून भाजपने अजून काही प्रतिक्रिया दिली नाही.

मात्र भारताचा कर्णधार विराट कोहली यांनी या आंदोलनावर बुधवारी रात्री एक ट्विट केलं आहे. कोहलीने लिहिले आहे की,”मतभेंदाच्या या घटनेत आपण सर्वजण एकत्र राहूया. शेतकरी आपल्यादेशाचं एक अविभाज्य भाग आहे आणि मला खात्री आहे की, सर्व पक्षांमधे शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि एकत्रित पणे पुढे जाण्यासाठी एक मैत्रीपुर्ण तोडगा निघेल.”

मात्र, दिल्लीतील कृषी कायद्या विरोधातील आंदोलन हे दिवसेेंदिवस वाढत चालले असून यावर काही तोडगा निघत नाहीये. ज्याचा फटका संपूर्ण देशाला बसत असून आता याचे पडसाद हे देशांतर्गत नसून आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील पोहचलं आहे. तर केंद्र सरकार शेतकर्यांचा या मागणी विरोधात कमी पडल्याचे दिसत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा