“महागाईचा विकास दिसणार पेट्रोल पंपावर” राहूल गांधींची उपरोधक टीका

नवी दिल्ली, ८ जून २०२१:  सलग एकामागून एक होणार्‍या इंधन दरवाढीने सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. आधी पेट्रोलने शंभरी गाठली त्यानंतर आता डीझेलही शंभरी गाठेल की काय अशी डीझेलची वाटचाल सुरू आहे. इंधन दरवाढीचा संबंध थेट वाहतूकीशी असल्याने इतर वस्तूंची महागाई सूद्धा वाढत आहे. इंधन दरवाढीने नागरिक त्रस्त झाली आहे. त्यामूळे सहाजिकच विरोधकांनी केंद्र सरकारला या प्रश्नावर घेरण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाना साधला आहे.
आपल्या व्टीटच्या माध्यमातून  राहूल गांधींनी ही उपरोधक टीका केली आहे….
“अनेक राजांमध्ये अनलॉकची प्रकिया सुरू झाली आहे.त्यामूळे जनता जेव्हा पेट्रोल पंपावर इंधन भरायला जाईल त्यावेळी जनतेला महागाईचा विकास दिसणार आहे. ” अशी कोपरखळी राहूल गांधी यांनी केंद्र सरकारला मारली आहे. इंधन दरवाढी विरोधात काँग्रेस कडून राज्यामध्ये अनेक पेट्रोल पंपावर निदर्शने करण्यात आली आहेत.
केंद्रात डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आघाडीचे सरकार असताना, सन २०१४ मध्ये कच्च्या तेलाच्या बॅरलची किंमत १४५ डॉलर पर्यंत वाढली. तरीही पेट्रोल, डिझेलचे दर मर्यादित राहिले होते. मात्र, सध्या कच्च्या तेलाच्या बॅरलची किमती ५० डॉलर दरम्यान असताना लिटरला पेट्रोल शंभर, तर डिझेल ९२ रुपयांवर, तसेच स्वयंपाकाचा गॅस ९०० रुपयांवर पोहोचला आहे.
दरम्यान तूर्तास इंधन दरवाढ रोखण्यास सक्षम नसल्याचे स्पष्टीकरण पेट्रोलीयम मंत्री धर्मेंद प्रधान यांनी दिलेले आहे. त्यामूळे आणखी किती काळ सामान्य जनतेला महागाईचे चटके सहन करावे लागतील हा प्रश्नच आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा