राहुल शेवाळे- गटनेते, भावना गवळी- मुख्य प्रतोद- घोषित

दिल्ली, १९ जुलै, २०२२ : शिवसेनेचे १२ खासदार फुटून ते लवकरच शिंदे गटात सामील होणार का नाही, याबाबत संभ्रम होता. पण त्यावर आता उत्तरे मिळाली आहेत. या संदर्भातली पत्रकार परिषद दिल्लीतल्या मुख्यमंत्री सदनात पार पडली. १८ पैकी १२ खासदार या सदनात उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी १२ खासदारांचं स्वागत करताना सांगितलं की, आम्ही १२ खासदारांनी मिळून आज लोकसभा स्पीकर यांच्याकडे पत्र दिलं. ज्यात त्यांनी आमचे गटनेते आणि पक्षनेते वेगळे असावे, असा आशयचं पत्र दिलं.
यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांनी आम्ही पुढे जात आहोत, तर विकासासाठी काही कमी पडू देणार नाही, हे सांगताना केंद्रसरकारचं समर्थन केलं. ज्यावेळी खासदार एकीकडून दुसरीकडे जातात, तेव्हा ही विकास नक्कीच महत्वाचा आहे, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

हे सरकार जनतेचे आहे. त्यामुळे जनतेच्या मनातील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. ज्यानुसार शेतकरी आत्महत्या कमी व्हाव्या यासाठी नवनवीन योजना सुरु करत आहोत. पेट्रोल डिझेलवरचे दर कमी केल्या. अशा मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांनी प्रकाशझोत टाकला. अडीच वर्षापूर्वी सेना-भाजप सरकार तयार व्हायला हवं होतं, असंही त्यांनी सांगितलं.
राहुल शेवाळे यांनीही यावेळी अनेक मुद्द्यांना हात घातला. आमच्या विरोधी उमेदवारांना ताकद देण्यात आली. पण आमचे हात रिकामेच राहिले. आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबत चार ते पाच वेळा बैठक केली. पक्षाकडे वेळोवेळी भूमिका मांडली. पण त्यावर विचार विनिमाय झाला नाही. त्यावेळी मलाही युती करायची आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. पण भाजपकडून योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आमचे अतिशय नुकसान झाले आहे, असेही राहुल शेवाळे यांनी सांगितलं. यावेळी पुन्हा एकदा संजय राऊत हा मुद्दा ऐरणीवर आला. संजय राऊत यांच्या वक्तव्यांची दखल घेण्याची आवश्यकता नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारंवार सांगितले. संजय राऊतांनी मविआचा कार्यक्रम राबवला आणि आम्हाला कायम मागे ठेवले, असे राहुल शेवाळे यांनी माध्यमांना सांगितले.

गटनेता बदलावा अशी आम्ही विनंती केली होती. मात्र आम्ही अजूनही एनडीएतच आहोत. आम्ही शिवसेनेतच आहोत. कुठलाही गट बनवला नाही, तर मी राहुल शेवाळे गटनेते म्हणून आणि भावना गवळी मुख्य प्रतोद म्हणून घोषित झालो आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा