नेवासा येथील दोन कत्तलखान्यांवर धाडी, सव्वा पाच लाखांच्या मुद्देमालासह तिघांना अटक

8

नेवसा २६ जून २०२३: नगरची स्थानिक गुन्हे शाखा व नेवासा पोलिसांनी शहरातील दोन कत्तलखान्यांवर पहाटे छापा टाकून, २१ लहान मोठी जिवंत जनावरे, मांस व तीन लाखांची स्विप्ट गाडी, असा सुमारे सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली. पोलिसांच्या या धाडसत्राने चांगलीच खळबळ उडाली असुन याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी मयूर गायकवाड यांनी फिर्याद दिली.

गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखेसह नेवासा पोलिसांनी शहरातील दोन कत्तलखान्यांवर धाड टाकली. यामध्ये अबू शहाबुद्दीन चौधरी, मोजू अबू चौधरी यांच्याकडून शिर नसलेल्या जनावरांचे ३५ हजार ४०० रुपये किंमतीचे २१५ किलो मांस, कातडी, सत्तूर तसेच जबी लतिफ चौधरी यांच्याकडून ३२ हजार किंमतीचे २०० किलो मांस, कातडी, सत्तूर व एक स्विप्ट गाडी आणि ३ मोठ्या गायी व १८ लहान मोठी वासरे, असा सुमारे ५ लाख १२ हजार ४०० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्या आहे.

बोलोरो गाडीत मांस विक्री करणारा नदीम चौधरी हा गाडीसह पसार झाला. गोवंशीय जनावरांची कत्तल करण्याची मनाई असतानाही या जातीची जिवंत जनावरे डांबून ठेवून त्यांची कत्तल करताना मिळाल्या प्रकरणी, पोलिसांनी चौघांविरुद्ध भादंवि कलम २६९, ३४ व पशू संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक शिवाजी राव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिक तपास करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा