मुंबई : मकरसंक्रात आल्यानंतर अनेकांना पतंग उडवण्याचे वेध लागतात. मात्र, पतंग उडवताना काळजी घेणे आवश्यक आहे. पतंग उडवणे जीवावरही बेतू शकते. पश्चिम रेल्वे प्रशासनाने पतंग उडवताना रेल्वे रुळ परिसरापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.
त्यामुळे पतंग उडवण्यासाठी मोकळ्या जागा असलेल्या रेल्वे रुळ परिसरात अनेकजण जातात. मात्र, या ठिकाणी पतंग उडवणे जीवावर बेतू शकते, असा इशारा रेल्वे प्रशासनाने दिला आहे. मुंबईत उपनगरीय रेल्वे मार्गावरील ओव्हर हेड वायरचे २५९ हजार व्होल्ट्स एसीवर विद्युतीकरण करण्यात आले आहे.
पतंगांच्या मांजाला मेटालिक पावडरचे कोटिंग लावण्यात आलेले असते. ज्याच्यामुळे रेल्वे रुळावरील ओव्हरहेड वायरच्या संपर्कात हा मांजा आल्यास जीवितहानी होण्याचा धोका आहे.
रेल्वे रुळाजवळ पतंग उडवणे, पतंग काढणे, ओव्हरहेड वायरमधून मांजा काढणे आदी प्रकार टाळावेत असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. पतंग ओव्हरहेड वायरवर पडल्यामुळे रेल्वे सेवेवरही परिणाम होण्याची शक्यता असते.