महाराष्ट्रातील बहुतांश भागात २२ ते २४ जून दरम्यान पावसाचा अंदाज

पुणे २० जून २०२३: तळ कोकणातील मान्सून अदयाप तरी पुढे सरकलेला नाही, परंतु मान्सून पुढे सरकण्यासाठी पोषक वातावरण असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलय. दरम्यान २२ ते २४ जूनपर्यंत राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली गेली आहे, आयएमडी पुणेचे विभागप्रमुख के.एस.होशाळीकर यांनी याबाबत माहिती दिली.

होशाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार २२ ते २४ जून दरम्यान संपूर्ण कोकणात व्यापक स्वरूपात पाऊस पडणार आहे. तर याच काळात उत्तर आणि दक्षिण कोकण, विदर्भातील बऱ्यापैकी भागात पावसाची दाट शक्यता आहे, असे होशाळीकर यांनी सांगितले.

पुढील ७२ तासांमध्ये मान्सून मुंबई-पुण्यातही दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तीव्र झाल्यामुळे मान्सून आणखी सक्रीय होण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्यात. यामुळे रत्नागिरीमध्ये मान्सूनचा थांबलेला प्रवास, आता पुढे सरकून पुढील तीन दिवसांमध्ये मान्सूनचे मुंबईत आगमन होऊ शकते, असे हवामान तज्ज्ञ डॉ.अनुपम कश्यपी यांनी सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा