बारामती तालुक्यात पावसाचा हाहाकार! पाण्यात वाहून गेली कार

बारामती,१२ ऑक्टोबर २०२२: बारामती तालुक्याच्या जिरायती भागाला काल पासून पावसाचा जोरदार तडाका बसला आहे. काल मुर्टी, मोरगाव, सुपे परिसरासह संपूर्ण तालूक्यात जोरदार पाऊस पडला आहे. आणि आज सकाळ पासून पावसाचा जोर वाढत असल्याने कऱ्या नदीला मोठ्या प्रमाणात पाण्याची वाढ झाली आहे.

या पाण्यात एक चारचाकी मोटार वाहून गेल्याची घटना घडली आहे. दरम्यान या मोटारीचा आजून तपास लागलेला नाही. ही मोटार लोणी भापकर येथील वैद्यकीय व्यावसायिकाची असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ते नदीवरुन जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने मोटार वाहून गेली.

गाडी वाहून जात असताना त्यानी गाडीमधून उडी मारल्यांने त्यांचा जीव वाचला आहे. डॉक्टर बारवकर हे दवाखाना बंद करुन घरी जात असताना ही घटना घडली आहे. नदीपात्रातील पुलावरुन पाणी वाहत असताना. कोणीही पुलावरुन न जाण्याचे आव्हान महसूल खात्याच्या वतीने तलाठी श्याम झोडगे यांनी केले आहे.

बुधवारी (आज) सकाळपासूनच बारामती तालुक्यात जोरदार पाऊस सूरु आहे. तसेच बारामती शहरात पावसाचा जोर अधिक असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आव्हान केले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा