नवी दिल्ली, १६ नोव्हेंबर २०२०: दिवाळीनंतर फटाक्यांच्या धूरातून लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. हरियाणा, पंजाबसह दिल्ली-एनसीआरच्या अनेक भागात रविवारी अचानक हवामान बदललं. मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळं थंडी वाढली आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेश, राजस्थान आणि बिहारसह उत्तर भारतातील बहुतेक राज्यात थंडी वाढण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या फटाक्यांमुळं रविवारी झालेल्या पावसानं प्रदूषण कमी करण्याचं काम केलं ही दिलासाची बाब आहे. उत्तर भारतातील या पावसातून हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्याची नोंद झाली आहे. प्रदूषणामुळं निर्माण झालेल्या धुरापासूनही लोकांची सुटका झाली. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार या पावसामुळं प्रदूषणाची पातळी कमी होईल आणि दिल्लीत धुकंही सुधारतील. प्रदूषणामुळं निर्माण झालेला धूर दूर झाल्यानं लोकांनी मोकळा श्वास घेतला. डोळ्यातील जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास होण्यापासूनही लोकांना दिलासा मिळाला आहे. दिल्ली-एनसीआर वेस्टर्न डिस्टर्बन्समध्ये पावसानं हजेरी लावली.
मध्य प्रदेशात पावसाचा इशारा, धुकं कमी होईल
मीडिया रिपोर्टनुसार मध्य प्रदेशात पावसाचा इशारा देण्यात आला आहे, ज्यामुळं राज्यातील लोकांना धुक्यापासून आणि वायू प्रदूषणापासून आराम मिळू शकेल. हवामान खात्यानं ९ जिल्ह्यात पावसाचा इशारा दिला आहे. दिल्ली आणि हरियाणाच्या बर्याच भागात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळं मध्य प्रदेश मध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे. येत्या २४ तासांत ग्वाल्हेरमध्ये पाऊस पडंल असं देखील सांगितलं जात आहे.
दिल्लीत प्रदूषणामध्ये घट
त्याचबरोबर राजधानी दिल्लीत पावसामुळं पीएम १० आणि पीएम २.५ मध्ये सुधारणा झाली आहे. सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ज्या भागात प्रदूषण जवळपास ८ पट जास्त होते, मात्र पडलेल्या मुसळधार पावसानं संध्याकाळी प्रदूषणाची पातळी आता ३ पट कमी केली आहे. दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीच्या म्हणण्यानुसार बावानामधील पीएम १० पातळी ३३५ पर्यंत पोहोचली आहे तर पीएम २.५ पातळी १५१ आहे.
हरियाणामध्ये लोकांनी घेतला मोकळा श्वास
हरियाणामध्ये देखील वातावरणात बदल होताना दिसत आहे. रविवारी सायंकाळी पाऊस व गारपीटीनंतर सोमवारी सकाळीही अनेक ठिकाणी पाऊस पडला. बर्याच ठिकाणी दाट ढगाळ वातावरण आहे. इथल्या पावसामुळं धुक्यापासून लोकांना दिलासा मिळाला. एवढंच नव्हे तर प्रदूषणाची पातळीही बरीच कमी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढत्या वायू प्रदूषणामुळं लोकांना दिलासा मिळाला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे