कोकणात ७ जानेवारी पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता

सिंधुदुर्ग, ५ जानेवारी २०२१: राज्यात मराठवाडा, संपूर्ण मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पुढचे दोन दिवस ढगाळ वातावरण कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यासह राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस देखील पडत आहे. त्यामुळे महत्त्वाच्या पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

सिंधुदुर्ग मध्ये पाऊस

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. सिंधुदुर्गाच्या कुडाळ, वेंगुर्ले या तालुक्यांमध्ये काल रात्री आणि आज पहाटे सुद्धा जोरदार पाऊस बरसला. या अवकाळी पावसामुळे सध्या आंबा व काजू उत्पादक चिंतेत आहेत. कारण या दोन्ही पिकांवर या अवकाळी पावसामुळे रोग पडण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. कोकणात ७ जानेवारी पर्यंत कमी अधिक प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

हवामान खात्याचा अंदाज

कोकणामध्ये गेले दोन दिवस ढगाळ वातावरण आहे. हे ढगाळ वातावरण चार ते पाच दिवस राहण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण स्थानिक परिस्थिती त्याला आपण लोकल इफेक्ट म्हणतो यामुळे निर्माण झाले आहे. दरम्यानच्या काळात तापमानात वाढ झाली होती. त्यामुळे हे ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. याच ढगाळ वातावरणाचा परिणाम म्हणून कोकणामध्ये पुढील चार ते पाच दिवस काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस विजांच्या कडकडाटासह पडण्याची शक्यता आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा