पुणे वेधशाळेकडून पावसाचा इशारा, 21 ते 23 एप्रिल दरम्यान या जिल्ह्यांत पावसाची शक्यता

पुणे, 20 एप्रिल 2022: सध्या सगळीकडंच कडाक्याच्या उन्हाने लोक हैराण झाले आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांत पारा 40 अंशाच्यावर आहे. मात्र असं असलं तरीही पुणे वेधशाळेने राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. 21 ते 23 एप्रिल दरम्यान पावसाचा इशारा पुणे वेधशाळेने दिलाय. तशी माहिती के. एस होसाळीकर यांनी ट्विटरवरून दिली आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसात उन्हापासून थोडाफार दिलासा तर मिळेल मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे.

के. एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा सुटण्याची शक्यता आहे. तसेच 21- 23 April काही ठिकाणी हलका पाऊस किंवा वीजांचा गडगडाट होण्याची शक्यता आहे. या बातमीमुळं शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडणार आहे. कारण अचानक येणाऱ्या या पावसामुळं राज्यातील अनेक फळबागांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे आंब्याचंही नुकसान होऊ शकतं. याबरोबरच हातातोंडाशी आलेली पिकं देखील शेतकऱ्यांना गमवावी लावू शकतात.

कोणते जिल्हे अलर्टवर?

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये 21 आणि 22 तारखेला वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर ज्या जिल्ह्यात जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामध्ये बुलडाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली यांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत सध्या जास्त वाढ झालीआहे. राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशात वेगळ्या ठिकाणी धुळीचे वादळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूण हवामानावर त्याचा मोठा परिणाम होताना दिसून येत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा