राज्यात पावसाचा हाहाकार, बहुतांश जिल्ह्यांना रेड अलर्ट

5

मुंबई,९ ऑगस्ट २०२२: मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने संपूर्ण राज्यभर हाहाकार माजवला आहे. नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. तर मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवनही विस्कळीत झाले आहे. पुढील दोन दिवसात कोकण सह मध्य महाराष्ट्रात घाटमाथ्यावर अति मुसळधार पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे.

मुंबई सह परिसरात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे मुंबईमध्ये ठिकठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. त्याचा परिणाम वाहतुकीवरही झाला आहे. पश्चिम महाराष्ट्र,कोकण आणि मराठवाड्यातील काही भागातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

११ ऑगस्ट पर्यंत राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील दोन दिवसांमध्ये कोकण सह मध्य महाराष्ट्रामध्ये घाट माथ्यावर अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. नागरिकांनी या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्याचबरोबर राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा