पुणे, २२ ऑक्टोबर २०२२ : ऑस्ट्रेलियात टी -२० विश्वचषक १६ ऑक्टोबर पासून सुरू झाला असून भारताला पहिला सामना २३ ऑक्टोबर रोजी पाकिस्तान सोबत खेळायचा आहे. या दोन्ही संघांमध्ये महा मुकाबला पाहण्यासाठी चहात्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. या हाय व्होल्टेज सामन्याची क्रिकेट चाहते खूप आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र त्याआधी क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे.
या सामन्या आधी हवामान खात्याने २३ तारखेला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावेळी मेलबर्न मध्ये पाऊस होण्याची ७० टक्के शक्यता असल्याचा अंदाज आहे. अशा स्थितीत या दोन्ही टीम मधील हाय व्होल्टेज सामना रद्द होण्याची शक्यता जास्त प्रमाणावर आहे.
आयसीसीच्या नव्या नियमानुसार सामन्यात जर पाऊस पडला आणि रद्द झाला किंवा सामन्याचा निकाल लागला नाही तर दोन्ही संघांमध्ये एक-एक गुण विभागला जाईल आणि जर सामना सुरू होण्यापूर्वी पाऊस पडला आणि पाच ओव्हर ही टाकण्याची परिस्थिती नसेल, तर राखीव दिवस वापरला जाईल किंवा जर सामना सुरू झाला आणि मध्येच पाऊस पडला आणि सामना पुन्हा सुरू होऊ शकला नाही तर राखीव दिवशी सामना जिथे थांबला होता तिथून पुढे खेळवला जाईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव