उडीद पिकाचे पावसात भिजून नुकसान

इंदापूर, ६ ऑक्टोबर २०२०: खरीप हंगामातील उडीद पिकाचे पावसात भिजून नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. सध्या उडीद पिकाची काढणी अंतिम टप्प्यात आहे.

काढणी झालेल्या उडीद पिकाच्या शेंगाना कोंब फुटले आहेत. तसेच उडीद पिकाची गुणवत्ता ढसाळली आहे, असे झगडेवाडी येथील युवा शेतकरी अतिश कांतीलाल झगडे यांनी यांनी सांगितले.

अतिश झगडे यांनी १२ एकर डाळींब पिकात उडीदाचे आंतरपीक घेतले. या पीकाची काढणी चालु झाल्यापासून सतत पाऊस चालु असल्याने हे पीक अनेकदा पावसात भिजले आहे. काढणी केलेल्या उडीद पिकाच्या शेंगा पावसामुळे वाळत नसल्याने मळणीची कामे लांबत चालल्याचे झगडे यांनी सांगितले.

सध्या पीक वाळविण्यासाठी मजुरांवरती खर्च वाढल्याची माहिती अतिश झगडे यांनी दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा