महाराष्ट्रात आजही वादळी वाऱ्यासह पाऊस, हवामान खात्याचा अंदाज

पुणे, २८ नोव्हेंबर २०२३ : हलकी थंडी, अचानक अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे महाराष्ट्रातील बहुतांश भाग प्रभावित झालाय. या अवकाळी पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. पुढील दोन दिवस महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

भारतीय हवामान खात्याने विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असुन यवतमाळमध्ये गारपीट अपेक्षित आहे. अशा अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांवर आणखी एक संकट ओढावण्याची शक्यता आहे.

विदर्भातील अकोला, अमरावती, गोंदिया आणि नागपूरमध्ये आज विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. तर पुढील दोन ते तीन दिवस विदर्भात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता असल्याने भारतीय हवामान खात्याने शेतकऱ्यांना आपल्या पिकांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. येत्या तीन दिवसांत मध्य भारतातील किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. थंडीमध्ये थोडीशी वाढ झाली असुन काही ठिकाणी धुकेही पाहायला मिळत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा