राज्यात पुढील पाच दिवस मेघगर्जनेसह पाऊस

पुणे, ११ जून २०२३: कित्येक दिवस प्रतीक्षेत असलेला मान्सून अखेर आज महाराष्ट्रात दाखल झाला आहे. सध्या मान्सून तळ कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात दाखल झाला असून, पुढील काही तासांत तो संपूर्ण महाराष्ट्रात पोहचाणार आहे. पुढच्या चार ते पाच दिवसांत राज्यात वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अशी माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस. होशाळीकर यांनी दिली आहे.

नैॠत्य मान्सूनचे आज महाराष्ट्रात आगमन झाले. दक्षिण कोकणातील काही भाग, दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भाग, संपूर्ण गोवा, कर्नाटक व तामिळनाडू व आंध्र प्रदेशचा काही भाग मान्सूनने व्यापला आहे. रत्नागिरी, शिमोग, श्रीहरिकोटा, दूभरी इथपर्यंतचा भाग मान्सूनने व्यापला आहे. त्यामुळे पुढचे चार ते पाच दिवस महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

यंदा महाराष्ट्रात मान्सून एक दिवस उशीरा पोहचला आहे. यावर्षी मान्सून केरळमध्ये आठ जूनला दाखल झाला, त्यानंतर आज महाराष्ट्रात आगमन झाले आहे. त्यामुळे कित्येक दिवसांपासून कडाक्याचे ऊन आणि उकाड्याने हैराण झाले होते, मान्सूनच्या आगमनाने या गरमी पासून दिलासा मिळणार आहे. असे देखील हवामान विभागाने सांगितले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा