सुरेश रैनाच्या कुटुंबावर झालेल्या हल्ल्यानंतर रैनाने पंजाबच्या मुख्यमंत्र्यांकडून केली ही मागणी

नवी दिल्ली, १ सप्टेंबर २०२०: पूर्व भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना याच्या कुटुंबावर काही दिवसांपूर्वी जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. तसेच या हल्ल्यामध्ये सुरेश रैनाच्या  कुटुंबातील एका सदस्याचा मृत्यू देखील झाला आहे. रैनाने आज ट्विट करत आणखी एक दुःखद बातमी दिली आहे. त्याच्या कुटुंबातील आणखी एका सदस्याचा मृत्यू झाला आहे. भारतीय संघाच्या या खेळाडूने ट्विटरच्या माध्यमातून पंजाब चे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग तसेच पंजाब पोलिस यांना या घटनेबद्दल कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सुरेश रैनाने मंगळवारी केलेल्या ट्विट मध्ये लिहिले की, माझ्या कुटुंबासोबत जे काही पंजाब मध्ये घडलं ते खूप भयानक होत. माझ्या काकांची हत्या करण्यात आली आहे. तसेच माझी आत्या आणि माझे दोघे चुलत भावांना यांना या हल्ल्यात गंभीर अशा जखमा सुद्धा झाल्या आहेत. ,माझ्याचुलत भावाने काल रात्री शेवटचा श्वास घेतला. खूप दिवसांपासून तो मृत्यूशी झुंज देत होता, माझ्या आत्याची प्रकृतीही खूप गंभीर आहे”. तसेच पुढे तो म्हणाला, त्या रात्री नक्की काय घडलं कोणी घडवलं ही आम्हाला अजून पर्यंत माहीत नाही.  मी पंजाब पोलिसांना या प्रकरणात चौकशी करावी अशी मागणी करतो. आम्हाला इतका तर हक्क आहेच की अशी हरकत कोणी केली आहे.

अपराध्यांना अपराध करून असं मोकळं सोडता नाही येणार. असं ट्विट करून रैनाने पंजाब पोलिसांना आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांना टॅग केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा