पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी करोना व्हायरसपासून देशाला वाचविण्यासाठी पुढच्या २१ दिवसांसाठी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केलीय. हा लॉकडाऊन २१ दिवसांचा असणार आहे. काल, मंगळवारी मध्यरात्रीपासून या लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाली. करोनाचा संसर्ग रोखणे हा या मागील उद्देश आहे. दरम्यान आज मध्या रात्री पुण्यात पावसाच्या सरी कोसळल्या. पुणे शहर व आजूबाजूच्या परिसरात काल ठीक ठिकाणी पाऊस पडला
कोरोनाचे संकट ओढवले असताना आता ही वातावरणातील होणारी बदल आजारी पडल्यास आणखी भर टाकू शकते. कोरोणाची लक्षणे सर्दी खोकला यांसारखी आहेत तर पावसाने वातावरणात गारवा निर्माण होऊ शकतो जो सर्दी खोकल्याचा आणखी बळ देऊ शकतो. काही ठिकाणी गारा पडल्याची देखील सांगितले जातं आहे.
इतकेच नव्हे तर आधीच भाजी पाल्याचा तुटवडा आहे त्यात असे नैसर्गिक संकट ओढवले तर समस्या आणखी वाढू शकतात. पिकांचे नुकसान होऊ शकते. दुसरीकडे कोरोणाचे संकट आणखी बळावत असल्याचे दिसून आले आहे. करोनामुळे तामिळनाडूत एकाचा रुग्णाचा मृत्यू झाला आहे. करोनामुळे तामिळनाडूत पहिला बळी गेला असून देशातील करोनामुळे दगावणाऱ्यांचा आकडा ११वर पोहोचला आहे.