विदर्भात पावसाचा तांडव, अनेक गावे पाण्याखाली; मदतीला हवाई दलाची मागणी

महाराष्ट्र, ३० ऑगस्ट २०२०: सध्या राज्यात पावसाचा जोर वाढला असून महाराष्ट्रातील अनेक भागात पुढील काही दिवस ऑरेंज आणि रेड अर्लट हवामान खात्याने दिला आहे. तसेच मध्य महाराष्ट्रासह मुंबई, कोकण, पुर्व विदर्भ अशा ठिकाणी पावसाची रिपरिप हि चालूच आहे. तर अनेक भागात पुरपरिस्थिती निर्माण झालीये.

पुर्व विदर्भात पावसाचा हाहाकार चालू असून जोरदार पावासामुळे भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्हातील अनेक मार्ग बंद झाले असून अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. चंद्रपुरच्या ब्रह्मपुरीचा लाडज गावाला पुराच्या पाण्यचा विळखा झाला आहे. सध्या लोकांना बोटीने बाहेर काढण्याचे काम चालू आहे.

चंद्रपुरच्या जिल्हा आधिकाऱ्यांचे विचार हे सध्या पुरात अडकलेल्या लोकांना एयरलिफ्ट करण्याचा विचार चालू आहे. कारण बोटीने शक्य तेवढी मदत होत नसून लोकांना पुराबाहेर काढण्यात वेळ लागतोय, म्हणून आता चंद्रपुरच्या जिल्हा आधिकाऱ्यांनी हवाई दलाकडे मदत मागितली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा