पुणे १७ एप्रिल २०२२ : राज ठाकरे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. संपलेल्या पक्षावर आम्ही बोलत नाही असं म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंनाच नव्हे तर सर्वांना आता मनसे पक्ष अस्तित्वात असल्याचं राज ठाकरेंनी गुढी पाडव्यापासून दाखवून दिल.
हनुमान जयंतीला महाआरती करुन त्यांनी सांगितलं की पक्ष अस्तित्वातच नाही तर सक्षमही आहे. गुढी पाडव्साच्या सभेत त्यांनी मुसलमान बांधवांना मशिदीवरुन भोगें काढण्याचा आदेश दिला होता. तेव्हा ३ मे ला अल्चीमेटम दिला होता. त्यांवर ठाम असल्याचं त्यांनी पुन्हा स्पष्ट केलं. जर तीन मे पर्यंत भोंगे उतरवले नाही तर पाच वेळा हनुमान चालीसा लावण्यात येण्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्र दिनाला संभाजी नगरमध्ये सभा घेणार असल्याचं आणि ५ जूनला अयोध्या दौरा करणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. आम्हाला दंगल , हाणामारी नको असंही त्यांनी सांगितलं. जातीयवादाचं राजकारण होत असल्याच्या शरद पवार आणि संजय राऊत यांना हा टोला असल्याचं त्यांनी दाखवून दिलंय. आता झोपलेला मनसे पक्ष खडबडून जागा झाला असच म्हणावं लागेल. पुन्हा एकदा आता निवडणुकीची गणित आणि समीकरण बदलणार हे नक्की…
न्यूज अनकट प्रतिनिंधी- तृप्ती पारसनीस