औरंगाबाद, 2 मे 2022: काल औरंगाबाद मध्ये राज ठाकरे यांनी सभा घेतली. या सभेची चर्चा आधीपासूनच राज्यभर सुरू होती. अपेक्षेप्रमाणे यावेळीही राज ठाकरे यांनी आघाडी सरकार वर सडकून टीका केली. मागच्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर राज्यात जातीय राजकारण करत असल्याचा आरोप केला होता. आता या वेळीही राज ठाकरे यांनी नाही शरद पवार यांच्यावर पुन्हा निशाणा साधलाय. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्यात जातीय राजकारण सुरू झालं असा आरोप राज ठाकरे यांनी केला.
शरद पवारांवर टीका करत पुढं राज ठाकरे म्हणाले की, ज्या माणसाने छत्रपती शिवाजी महाराजांची किर्ती संपूर्ण जगभर पसरवली त्या बाबासाहेब पुरंदरे यांच्या वृद्धप काळात शरद पवार यांनी त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. पुढं ते म्हणाले की, रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली त्यांनादेखील तुम्ही आता ब्राह्मण म्हणून पाहणार आहात का? असा सवाल देखील राज ठाकरे यांनी शरद पवार यांना केलाय. राज ठाकरे यांनी केलेल्या या दाव्यामुळं राज्यात पुन्हा नवीन वाद सुरू झालाय.
पवारांना हिंदू या शब्दाचीच अॅलर्जी
पवारांना हिंदू या शब्दाचीच मुळात अॅलर्जी आहे. प्रत्येक वेळेला बोलताना शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. आहेच. पण त्याआधी तो शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. त्यांच्या तोंडी कधी शिवाजी महाराजांचं नाव येत नाही. मी बोललो तेव्हापासून ते शिवाजी महाराजांचं नाव घेत आहेत. फोटोही लावत नाही. आता फोटो लावत नाही. मी जात मानत नाही. मी ब्राह्मणांची बाजू घेऊन बोलत नाही, अशा शब्दात राज ठाकरे यांनी पवारांवर हल्ला चढवला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे