वाढीव वीज बिलासंदर्भात राज ठाकरेंची राज्यपालांशी चर्चा

मुंबई, २९ ऑक्टोबर २०२०: आज राज ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली. मात्र, राज ठाकरे यांनी अचानक राज्यपालांची भेट घेतल्यामुळं ही भेट कशासाठी घेण्यात आली असावी यावर चर्चा सुरू होत्या. मात्र, या भेटीदरम्यान राज ठाकरे आणि राज्यपाल यांच्यात वाढीव वीज बिलावरून चर्चा झाली असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. ‘कोरोनाच्या काळात जनतेचं अतोनात हाल झालं. अनेक प्रश्न अजुनही प्रलंबित आहेत. वीज बिलाचाप्रश्न मार्गी लागला पाहिजे. भरमसाठ वीजबिले आली होतीत. ती अजुनही कमी झालेली नाहीत. त्यामुळं वीज बिल प्रश्नावर राज्यपालांशी चर्चा केली,’ असं राज ठाकरेंनी सांगितलं.

‘कोरोना काळात लोकांचे हाल झाले आहेत. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. कुंथत कुंथत चालत नाही. सरकारचं धरसोड धोरण योग्य नाही. लोकांचे प्रश्न सुटत नाही. मग सरकारचा काय उपयोग. विजबिलाबाबतचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे. कोरोनाच्या काळात भरमसाठ वीज बिलं आली होती. ती अद्याप कमी झालेली नाहीत. याबाबत पहिलं एक निवेदन दिलं आहे,’ असा इशारा त्यांनी ठाकरे सरकारला दिला

हे सरकार कुंथत कुंथत चालत आहे

राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेतली. मात्र, ही भेट कशाबद्दल आहे. ते सांगितलं नव्हतं. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी लोकांचे अनेक प्रश्न असल्याचे बोलून दाखविले. आज रेल्वे सगळ्यांसाठी सुरु नाही. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. लोकांचे प्रश्न सुटलेले नाही. वीज बिलाचा प्रश्न कायम आहे. लोकांची बिले कमी झालेली नाहीत. हे सरकार कुंथत कुंथत चालत आहे. सरकारचं धरसोड धोरण आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा