Raj Thackeray should not have immoral relationships: सध्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्याबाबत महत्वाचं विधान केलय. राज यांनी उद्धव ठाकरे ठाकरेंना अप्रत्यक्ष प्रस्ताव दिला असला तरी, त्याला आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिलाय. मात्र आमची एकच अट आहे आणि ती म्हणजे महाराष्ट्र विरोधी भूमिका घेणाऱ्यांशी राज ठाकरेंनी अनैतिक संबंध ठेवू नयेत. कारण आमची भूमिका महाराष्ट्र विरोधी पक्ष आणि नेत्यांविरोधात असेल, असे मत राऊत यांनी व्यक्त केलंय.
मी दोन नेत्यांचं नेहमी कौतुक करतो, एक म्हणजे राज ठाकरे आणि दुसरे नारायण राणे
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत असतील तर आम्ही स्वागत करतो, पण अजित पवार आणि शरद पवार एकत्र दिसले की तुम्हाला त्रास होतो, अशी टीका अजित पवार गटाकडून संजय राऊत यांच्यावर करण्यात आली होती. त्यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, “अजित पवारांनी अमित शाह यांच्या पाठबळावर शरद पवारांचा पक्ष हातचलाखीने हडपला. उदाहरणार्थ मी दोन नेत्यांचं नेहमी कौतुक करतो, एक म्हणजे राज ठाकरे आणि दुसरे नारायण राणे. नारायण राणे यांनी पक्ष सोडून स्वतःचा पक्ष स्थापन केला. पण कधीच ‘मीच खरा शिवसेनाप्रमुख’ असं म्हणाले नाहीत. त्यांचा पक्ष चालला नाही, मग ते दुसऱ्या पक्षात गेले आणि आपलं राजकारण सुरू ठेवलं, तर राज ठाकरे यांनी देखील स्वतःचा पक्ष स्थापन केला. तेव्हा आमच्यात मतभेद झाले, पण त्यांनी स्वतंत्र राजकारण केलं, शिवसेनेवर दावा केला नाही, हे मी मान्य करतो. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी अमित शाह यांच्या सांगण्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडली, अशा शब्दात खासदार राऊतांनी आपलं मत आज माध्यमांसमोर मांडलय.
न्यूज अनकट प्रतिनिधि – ऐश्वर्या शिलवंत












































