दिल्ली येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह राज ठाकरे निवडणार

पुणे १२ सप्टेंबर २०२४ : तब्बल सात दशकांनी दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाची निवड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख आणि प्रसिद्ध व्यंगचित्रकार राज ठाकरे करणार आहेत.

दिल्लीत ७० वर्षांनी होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचा मान सरहद संस्थेला मिळाला असून फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात नियोजित असणाऱ्या या साहित्य संमेलनासाठी सरहद संस्थेच्या वतीने बोधचिन्ह स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत देशभरातून शंभरहून अधिक कलाकारांनी सहभाग घेतला. त्यांच्या कलाकृतीतून संमेलनासाठी वापरण्यात येणाऱ्या बोधचिन्हाची निवड मनसे अध्यक्ष राज ठाकरे करणार असून त्यांच्याच हस्ते या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात येणार आहे.

यापूर्वी १९५४ मध्ये दिल्ली येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी अध्यक्षपद भूषविले होते. मात्र, संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर प्रथमच देशाच्या राजधानीत प्रथमच मराठी सारस्वतांचा दरबार भरणार आहे.

न्युज अनकट प्रतिनीधी : जयश्री बोकील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा