राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल

मुंबई, १९ ऑक्टोबर २०२०: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना अचानक ताप आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती मिडिया रिपोर्ट्सनुसार मिळत आहे.

त्यांना दोन दिवसांपासून ताप येत होता. दरम्यान खबरदारी म्हणून त्यांची कोविड-१९ ची टेस्ट देखील करण्यात आली होती. पण सुदैवाने ही चाचणी निगेटिव्ह आली आहे. सध्या ते डॉक्टरांच्या निगरानीत असून त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दोन दिवसांपासून त्यांना ताप येत होता. त्यामुळे त्यांची कोविड-१९ आणि मलेरियाची टेस्ट करण्यात आली होती. मात्र या दोन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. मनसे नेते अमित ठाकरे लॉकडाऊनच्या काळात ग्राउंड लेवलवर जनतेसाठी काम करत होते. त्यात काही महिन्यांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत परप्रांतीय मजूर पुन्हा जर महाराष्ट्रात येणार असतील तर, ‘आंतरराज्यीय स्थलांतर कायद्यान्वये’ नोंदणी व वैद्यकीय तपासणी करूनच त्यांना प्रवेश देण्यात यावा आहे. तसेच परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रीय बांधवांना आपल्या राज्यात परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली होती.

त्याचबरोबर आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवल्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला त्यांनी पाठिंबा दिला होता. यासोबतच एम.पी.एस.सी सराव परीक्षा असो, स्थलांतरित मजूरांचा प्रश्न असो अशा अनेक प्रश्नांसाठी त्यांनी रस्त्यावर उतरून काम केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा