राज ठाकरेंची अनोखी मागणी..

विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना पावसाचा जोर वाढला आहे. अशा परिस्थिती मध्ये प्रचारसभांचा धडाका सुरु झाला आहे.
त्यावर मात करण्याची नामुष्की प्रत्येक पक्षावर आली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभा रस्त्यावर घेण्याची परवानगी राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे मागितली आहे.

पाऊस लांबल्याने मैदानांमध्ये सभा घेण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे रस्त्यांवर सभा घेण्याच्या परवानगीची मागणी करणारे पत्र मनसेने निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना लिहीले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकमधील मैदाने आरक्षित केली, मात्र पावसांमुळे मैदानात पाणी साचत असल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या सभा रद्द कराव्या लागत आहेत. राज ठाकरेंची पुण्यात पहिली प्रचार सभा होणार होती, मात्र पावसामुळे ती सभा रद्द केली. त्यामुळे प्रचार सभांसाठी रस्ते उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी मनसेने केली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा