राज ठाकरेंच्या सभांना मैदानं मिळेना

यंदाच्या विधानसभेला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ धडाडणार हे जरी नक्की झालं असलं तरी त्यांच्या सभांना मैदानं मिळणे कठीण झाले आहे. 
 
 राज ठाकरे 9 ऑक्टोबर रोजी ते पुण्यात सभा घेणार आहेत. पुण्यातील विविध मैदानांची मनसे पदाधिकाऱ्यांनी चौकशी करूनही राज ठाकरेंच्या सभेसाठी मैदानच उपलब्ध होत नसल्याची परिस्थिती आहे. 
 
 यामुळे अलका टाॅकीज चौकात तरी किमान सभेला परवानगी मिळावी, अशी मागणी मनसे पुणे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
 
 राज ठाकरे यांची पहिली प्रचारसभा कसबा मतदारसंघात होणार आहे. त्यासाठी मनसेने टिळक रोड व शनिवार पेठ भागातील रमणबाग शाळेकडे परवानगी मागितली होती. मात्र ही परवानगी देण्यात आलेली नाही.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा