राज ठाकरेंनी पक्षासाठी बनवला नवीन झेंडा

मुंबई : लोकसभा निवडणुकांमध्ये राज ठाकरे यांनी जोरदार सभा घेतल्या होत्या. त्यावेळेस असे वाटत होते की विधानसभा निवडणुकांमध्ये राज ठाकरे यांचा पक्ष काहीतरी वेगळी कामगिरी करून दाखवेल. परंतु विधानसभा निवडणुकीत सूर न गवसलेल्या राज ठाकरे यांनी आता संस्थात्मक पातळीवर मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे संघटनेतील प्रतिकांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या कारणामुळेच  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इंजिनाची दिशा बदलल्यानंतर आता झेंड्याचा रंग देखील बदलण्यात येणार असल्याचे बोललं  जात आहे.

या नवीन बदलानुसार मनसेच्या झेंड्यामध्ये रंग आणि काही इतर गोष्टीही मिळवण्यात आले आहेत. या बदलांमध्ये प्रामुख्याने झेंड्यामध्ये भगवा रंग समाविष्ट करण्यात आला आहे. त्याचबरोबर शिवाजी महाराजांची प्रतिमा ही या नवीन झेंड्यामध्ये असणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंतीदिनी २३ जानेवारी रोजी आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी मनसेचं पहिलं महाअधिवेशन आयोजित केलं आहे. याच दिवशी या झेंड्याचं अनावरण करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे इंजिनाची दिशा बदलल्यानंतर आता झेंड्याचा रंग बदलून राज ठाकरे यांच्या पक्षाला चांगले दिवस येतील का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, नवा झेंडा जो समोर (भगव्या रंगावर राजमुद्रा) येत आहे तोही मनसेचाच यापूर्वी वापरातील झेंडा आहे. चार वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी हा झेंडा पक्षात सादर केला होता. शिवजयंती आणि महाराष्ट्र् दिन यादिवशी हा झेंडा पक्षात वापरला जातो.

राज ठाकरेंच्या तुफान भाषणांमुळे मनसे सुवर्णकाळ सुरू झाला. पण २०१३ नंतर मात्र मनसेचा पडता काळ सुरू झाला. यानंतर प्रत्येक कार्यक्रमांमधून राज ठाकरे कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करत राहिले पण त्यांची मतांची झोळी रिकामी झाली. अखेर आता पक्षाला पुन्हा उभं करण्यासाठी मसने हिंदुत्वाचीही मोट बांधणार आहे. पण त्यासाठी आता राज ठाकरे कोणता झेंडा हाती घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा