राजस्थान : सूर्यनगरी एक्स्प्रेसचे ११ डब्बे रुळावरून घसरले, ८ प्रवासी जखमी

पाली, २ जानेवारी २०२३ राजस्थानमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. वांद्रेहून जोधपूरला जाणाऱ्या सूर्यनगरी एक्स्प्रेसचे तब्बल ११ डबे रुळावरून घसरले आहेत. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, सुमारे दहा ते पंधरा प्रवासी जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच, स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

मिळालेल्या माहितीनुसार, पाली येथील राजकीयावासासूर्यनगरी एक्स्प्रेसचेजवळ पहाटे ३ वाजून २७ मिनिटांनी ही घटना घडली. वांद्रेहून जोधपूरला निघालेली सूर्यनगरी एक्सप्रेस पाली येथील राजकीयावासाजवळ आली असता, एक्सप्रेसचे अकरा डबे रेल्वेरूळावरून घसरले. अपघाताची माहिती मिळताच, पोलिसांसह रेल्वे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रेनमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अधिक माहिती देताना सीपीआरओने सांगितले की, उत्तर पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि इतर उच्च अधिकारी रेल्वेच्या जयपूर मुख्यालयात या दुर्घटनेवर लक्ष देत आहे. यासोबतच रेल्वेकडून हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आली आहे.

  • जोधपूर मार्गावरील दोन गाड्या रद्द

दरम्यान, अपघातानंतर जोधपूर मार्गावरील २ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर १२ गाड्या डायव्हर्ट करण्यात आल्या असून प्रवाशांना सुरक्षित स्थळी नेण्यात येत आहे. यानंतर रेल्वे रुळ रिकामा केला जाईल. त्याचवेळी बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर हा मार्ग बंद करण्यात आला आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा