राजस्थानमध्ये ओबीसींना ६ टक्के अतिरिक्त आरक्षण मिळणार, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची मोठी घोषणा

जयपूर, १० ऑगस्ट २०२३ : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यातील अतिमागास जातींना अतिरिक्त आरक्षण (ओबीसी) देण्याची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट मध्ये लिहिले, इतर मागासवर्गीयांसाठी (OBC) सध्याच्या २१% आरक्षणाव्यतिरिक्त, ६% अतिरिक्त आरक्षण दिले जाईल, जे ओबीसी श्रेणीतील सर्वात मागासलेल्या जातींसाठी राखीव असेल. ओबीसी आयोगाकडून ओबीसी प्रवर्गातील सर्वात मागासलेल्या जातींची ओळख पटवण्यासाठी सर्वेक्षण केले जाईल आणि आयोग आपला अहवाल कालबद्ध पद्धतीने सादर करेल.

सीएम गेहलोत यांनी असेही लिहिले की, यामुळे अत्यंत मागासलेल्या जातींना सरकारी क्षेत्रात शिक्षण आणि सेवेच्या अधिक संधी मिळतील. एससी-एसटीच्या विविध संघटना लोकसंख्येच्या आधारावर आरक्षणाची मागणी सातत्याने करत आहेत. सरकारही या मागणीची चाचपणी करत आहे. EWS श्रेणीसाठी १०% आरक्षणामध्ये, राजस्थान सरकारने स्थावर मालमत्तेची अट काढून टाकली होती, जेणेकरून या वर्गालाही आरक्षणाचा पूर्ण लाभ मिळेल याची खात्री करता येईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा